कल्याण : ‘एक विद्यार्थी एक झाड’ अशी संकल्पना राबविण्यात यावी, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. च्या सी. एस. आर. फंडातून आणि सावली एन. जी. ओ. च्या सहकार्याने मांडा टिटवाळा परिसरात मियावाकी पध्दतीने करण्यात येणार्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभसमयी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले.
या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात टिटवाळयातील इंदिरानगर स्मशानभूमी परिसरातील सुमारे ४ एकर जागेत पहिल्या टप्प्यात ३०,००० देशी प्रजातीच्या वृक्षांची मियावाकी पध्दतीने लागवड करण्याच्या उपक्रमाचा आज प्रारंभ करण्यात आला, या वेळी महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. च्या पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे, जनरल मॅनेजर प्रोजेक्ट गोपाळ कृष्णानंद, सीनियर मॅनेजर अजय पगारे, मुख्य अद्यान अधिक्षक संजय जाधव, उपायुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी, माजी महापालिका सदस्य संतोष तरे, सावली या एन.जी.ओ.चे शांताराम माने, महापालिकेचा इतर अधिकारी वर्ग, कर्मचारी, टिटवाळयातील शेकडो शालेय विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
प्रत्येक मुलाने एक तरी झाड लावू अशी शपथ घ्यावी त्यामुळे आपले शहर, परिसर हरित होईल .या पुढील वर्षातही जास्तीत जास्त झाडे लावण्याचा आपण संकल्प करु ज्यामुळे प्रदुषण कमी होऊन कल्याण डोंबिवली नगरी ग्रीन सिटी होण्यास मदत होईल असे आयुक्तांनी पुढे सांगितले. निसर्ग संवर्धनासाठी पुढील वर्षी देखील वृक्ष लागवडीसाठी महापालिकेस सहकार्य केले जाईल अशी माहिती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. चे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे यांनी दिली. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. च्या माध्यमातून ३०,००० झाडे पहिल्या टप्प्यात लावून ‘ घन -वन निर्मिती’ करण्याचा मानस असल्याचे मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलेसदर ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये वड, पिंपळ तसेच मसाल्यांची झाडे, आयुर्वेदिक झाडे अश्या विविध देशी प्रजातींच्या झाडांची लागवड मियावाकी पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेस काहीही खर्च करावा लागणारा नसून हा सर्व खर्च भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या मार्फत करण्यात येणार आहे आणि सदर वृक्षांची देखरेख सावली या र्उध् मार्फत करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड उपक्रमा समयी उपस्थित विद्यार्थी वर्गाने देखील मोठ्या उत्साहात स्वहस्ते वृक्ष लागवड केली.
