कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे व्हिजन असलेले नेते असून त्यांनी केलेल्या सातत्यापूर्ण प्रयत्नामुळे मतदारसंघाचा कायापालट होत आहे, असे गौरवोदागर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. डोंबिवली पू. येथे उभारण्यात येणार्या वै. हभप संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविधायुक्त संकुल उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी नमूद केले. शनिवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलनाच्या पुनर्विकासाचे , तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नुतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १८० कोटी तर नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासोबत परिसरातील प्रेरणा वॉर मेमोरिअलचे उद्घाटनही करण्यात आले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने राज्यातील शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, `शासन आपल्या दारी’ तून नागरिकांना शासकीय सुविधा घरपोच मिळाल्या.महिला,युवक,शेतकरी व कामगारांसाठी राबविलेल्या योजनांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी आपण कोट्यवधीचा निधी दिला असून, हा विकास अधिक वेगाने पुढे नेले जाणार’ असे ते म्हणाले.लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असल्याचीही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आ.सुलभा गायकवाड, आ.राजेश मोरे,पदश्री माजी सैनिक गजानन माने, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,आयुक्त अभिनव गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘ २०१४ नंतर कल्याण – डोंबिवली शहराचा विकास हेच आमचे ध्येय राहिले. मेट्रो, उड्डाणपूल, शिळफाटा रस्ता सहापदरीकरण ,रेवेच्या अतिरिक्त मार्गिका हे मोठे प्रकल्प आज उभे राहत आहेत. लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून प्रत्येक प्रश्नाला बांधील राहून काम करत आहोत. `क्रीडा संकुलामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध होणार असून अनेक महान खेळाडू घडतील ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उभारण्यात येणार्या क्रीडा संकुलाचे एमआयडीसीच्या निधीतून प्रकल्प पूर्ण होणार आहे. पूर्ण झाल्यावर संकुलाची देखभाल कल्याण डोंबिवली महापालिकेकडे सोपवण्यात येणार आहे. २५ हजार चौ. मी. बहुमजली क्रीडा इमारत उभारण्यात येणार असून अंतर्राष्ट्रीय मानकांचा तरणतलाव (१,२५०चौ.मी.) उभारण्यात येणार आहे. त्यात ४०० चौ. मी. ड्रायव्हिंग पूल व प्लॅटप्रâॉम, १६,००० चो.मी.तळघर पार्किंग सह योगा, जिम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, स्क्वेशा, शूटिंग रेंज, जिमनॅस्टिक्ससह विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

या मध्ये क्रीडापटूंसाठी निवास व्यवस्था, बँक्वेंट हॉल्स,आधुनिक फिजिओथेरपी सेंटर आणि बहुपयोगी सभागृहाची समावेश असणार आहे.तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नुतीकरणानंतर अत्याधुनिक रंगमंच, प्रशस्त आसन व्यवस्था, अत्याधुनिक प्रकाश व ध्वनीव्यवस्था, नव्याने काँटिंग सह अधिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच डोंबिवली प. गरिबांचा वाडा पॅनल क्र.२२ माजी नगरसेवक विकास म्हात्रे व कविता वी. म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
