कल्याण : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येत्या २०२५ – २६ मधील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महानगरपालिकेसाठी निवडणूक कामकाजासाठी आवश्यक अधिकार्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना निवडणूक विषयक जबाबदार्या सोपविण्यात आल्या असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. संबंधित अधिकार्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व नियमाचे निवडणुकी विषयक खर्चाची नोंद घेऊन सदरचा खर्च संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्चाविषयी पथकाकडे दैनंदिनरित्या सादर करून काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, आगामी काळात निवडणूक प्रक्रियेबाबत टप्प्याटप्प्यानी पुढील आदेश व सूचना जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती ब प्रभाग सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
