नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतरची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून २५ डिसेंबर रोजी पहिले प्रवासी विमान उड्डाण करणार आहे. या दृष्टीने विमानतळ प्रशासनाने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी पहिली प्रवासी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. एकप्रकारे, हे विमान प्रवासाचे `मॉकड्रील’  होते आणि ते अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या चाचणीत प्रवाशांच्या संपूर्ण प्रवासाचे (एंट्रीपासून बोर्डिंगपर्यंत) सिम्युलेशन (एग्स्ल्त्aूग्दह) करण्यात आले. प्रवाशी चाचणी यशस्वी झाल्यामुळे, आता २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावर नियमित उड्डाणांना सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विमानतळ प्रशासनाने उड्डाणांसाठी तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.

१९,६५० कोटी रुपयांच्या खर्चाने विकसित करण्यात आलेले आणि देशातील सर्वात मोठे ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळ ठरलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता व्यावसायिक उड्डाणांसाठी सज्ज झाले आहे. अलीकडेच या विमानतळावर पहिली प्रवासी चाचणी (झ्aोहुी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या चाचणीत शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून संपूर्ण प्रक्रियेचे सिम्युलेशन करण्यात आले. यात चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेम  यांसारख्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण ट्रायलमध्ये इंडिगो , अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यात निमिया महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे, आता २५ डिसेंबर रोजी येथून पहिले विमान कोणत्या शहरासाठी किंवा देशासाठी उड्डाण करते आणि त्यातील पहिले प्रवासी कोण असतील, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *