कल्याण : कल्याण पूर्वेचे  कायापालट करणारे मा. आमदार गणपतशेठ गायकवाड ह्यांच्या सर्वधर्मीय लोकहितकारी सामाजिक सलोख्यानी त्यांनी स्थापन केलेल्या लोकहितवर्धक संघ ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच कल्याण पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती, आणि माता रमाबाई जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान दिन गौरव सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यांत आले.

या सोहळ्यांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या निर्मितीसाठी आपली वैयक्तिक जागा त्यावेळचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या विनंतीवरून दान करणारे स्मारकाचे जागामालक तसेच या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सर्वप्रथम मागणी करणारे ज्येष्ठ बौध्दसमाज बांधव ह्यांचा खास विशेष सत्कार करण्यांत आला. ह्या संविधान दिनानिमित्त कार्यशील महिला आमदार सौ. सुलभाताई गणपतशेठ गायकवाड ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग `ड’ कार्यालयाच्या भव्य प्रांगणात हा  संविधान सन्मान गीत संध्या ‘ ह्या भव्य अशा कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यांत आले होते. या कार्यक्रमांत इंडियन आयडॉल फेम गायक राहुल सक्सेना, ढोणे, व  आंबेडकरी विचारवंत आणि सुप्रसिध्द गायक शिरीष पवार, प्रवीण ढोणे, मीरा भालेराव, रोहित उन्हवणे तसेच ख्यातनाम निवेदक सुशीलकुमार चोरघे यांनी मनोरंजन करुन  आपली कला प्रशस्ती सादर करून संविधानरुपी  समाजप्रबोधन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पंचशील महिला मंडळाच्या उपासिकांनी वंदनीय बुध्द वंदना व भीमगौरव  स्तुती करुन केली. तद्नंतर भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या व आमदार सौ. सुलभाताई ह्याच्यासह त्रिवार अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या दरम्यान मा. आमदार गणपतशेठ गायकवाड ह्यांच्या सामाजिक सुविचाराने  ह्या स्मारकाच्या  निर्मितीसाठी कसा कठीण संघर्ष करुन ह्या भूमिकेवर आधारित सत्य एक जुनी चित्रफित दाखवण्यांत आली. या माध्यमातून स्मारक उभारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्यामागील घटनाक्रमांची माहिती उपस्थित सर्व नागरिकांना देण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचीही सर्वात प्रथम मागणी करणारे ज्येष्ठ धम्मबंधु आयु. अरविंद गायकवाड आणि स्मारकासाठी स्वतःची मालकीची  जागा उपलब्ध करून देणारे भूमिपुत्र हरिशेठ गायकवाड ह्यांचाही तमाम आंबेडकरी विचारधारणेच्या व धम्मबांधवांकडून  खास  विशेष सन्मानित करण्यांत आले.

अशा ह्या सोहळ्यात  सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. कल्याणजी घेटे साहेब, पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे साहेब, आपले युवा नेते वैभवशेठ गायकवाड,  उद्योजक संजयशेठ गायकवाड, अमित सोनवणे, मा. नगरसेवक अभिमन्यूदादा गायकवाड, मनोज राय, नगरसेवक, परिवहन सदस्य संजय मोरे, मा. नगरसेवक भिमराव डोळस, रितेश खराडे, अनंता पावशे, दलित मित्र म्हणून परिचित असणारे जेष्ठ समाजसेवक  अण्णासाहेब रोकडे, बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी देवचंद अंबादे, नगरसेविका हेमलता पावशे, शितल मढवी, ड प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, सविता हिले यांच्यासह अनेक मान्यवर आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *