बदलापूर : बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा दीपक राठोड यांचा विजय झाला आहे. हा विजय केवळ एका प्रभागाचा निकाल नसून, लोकशाहीवरील विश्वास अधिक बळकट करणारा आहे. पैसा, ताकद आणि सत्ताकेंद्रित राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या विश्वासावर मिळवलेला हा विजय आहे.

बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा दीपक राठोड यांचा विजय झाला आहे. हा विजय केवळ एका प्रभागाचा निकाल नसून, लोकशाहीवरील विश्वास अधिक बळकट करणारा आहे. पैसा, ताकद आणि सत्ताकेंद्रित राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या विश्वासावर मिळवलेला हा विजय आहे.

राठोड यांनी मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. कुटुंबातून उच्च शिक्षण घेणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आज त्या याच प्रभागात लहान मुलांसाठी शिकवणी वर्ग चालवतात. शिक्षण, समाजकार्य आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण त्यांना आहे.

या यशामागे त्यांचे पती दीपक राठोड यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. कुटुंबातील समतेची भूमिका आणि महिलांच्या राजकीय सहभागाला मिळालेली साथ ही बाब लोकशाही सशक्तीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पैसा आणि ‘मसल पॉवर’ पलीकडे जाऊन मतदार निर्णय घेऊ शकतो, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर शिक्षित आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील महिलांचे स्थानिक राजकारणातील वाढते प्रतिनिधित्व हे लोकशाहीच्या सुदृढतेचे लक्षण आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *